ज्या ठिकाणी श्रीकृष्णानं प्राण सोडले, तिथं आता काय आहे?

WhatsApp Group

Bhalka Tirth : सौराष्ट्रात असं एक ठिकाण आहे, जिथं श्रीकृष्णानं त्याचे प्राण सोडले. महाभारताच्या युद्धात गांधारीनं भगवान श्रीकृष्णाला मृत्यू आणि विनाशाचा शाप दिला होता, असं म्हटले जात असलं तरी, या युद्धाच्या ३६ वर्षानंतर त्याचा परिणाम दिसून आला. ज्या ठिकाणी कृष्णानं अखेरचा श्वास घेतला, तिथं आता मंदिर आहे. हे मंदिर फार प्रसिद्ध नाही आणि लोकही इथे येत नाहीत. महाभारत संपल्यानंतर धृतराष्ट्राचा वंश संपला. त्याचे सर्व १०० पुत्र मारले गेले. युद्ध संपल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीला भेटायला गेला, तेव्हा ती पुत्र शोकानं दु:खी झाली. तिला वाटलं की कृष्णाला हवं असतं, तर हे सर्व तो थांबू शकला असता आणि आपली मुलं जगली असती. कृष्णा समोर आल्यावर तिला राग आला. तिनं शाप दिला की जसा माझा मुलगा राहिला नाही, त्याचप्रमाणं तुझा वंशही नष्ट होईल.

….आणि कृष्णानं प्राण सोडले!

महाभारत संपल्यानंतर गांधारीच्या शापाचा परिणाम दिसून आला. यदुवंशी आपापसात भांडू लागले. त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णालाही या शापाचं बळी व्हावं लागलं. हे त्यालाही माहीत होतं. युद्धाच्या ३६ वर्षांनंतर तो द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेला. तिथं तो एका झाडाखाली विसावला होता. तेव्हा एका शिकाऱ्यांनं त्याला हरण समजले आणि त्याच्यावर बाण सोडला. जो त्याच्या डाव्या पायाला लागला.

हेही वाचा – भारीच! सुधा मूर्तींच्या जावयानं इंग्लंडमध्ये साजरी केली जन्माष्टमी; होऊ शकतात ब्रिटनचे पंतप्रधान!

तेव्हा कृष्ण एकटाच होता. जेव्हा शिकारी तिथं पोहोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चात्ताप करू लागला. ”यात तुझी चूक नाही. त्रेतायुगात मी राम आणि तू बळी. मग तू माझ्यामुळं मेलास. म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तो मला मारेल.” असं म्हणत कृष्णानं प्राण सोडले. तेव्हा ही जागा जंगल होती. पण नंतर कृष्णानं ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले.

भालका तीर्थ मंदिराबद्दल…

या ठिकाणाचे नाव भालका तीर्थ आहे. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचं मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामागे अशीही कथा आहे की झारा नावाच्या शिकारीच्या बाणाने त्याचा जीव घेतला, त्यानं इथं पूजा सुरू केली. नंतर इथं मंदिर बांधण्यात आले. भालका तीर्थ हे सोमनाथ मंदिरापासून जवळ आहे. सहसा जे लोक सोमनाथ मंदिरात येतात, ते या ठिकाणी दर्शनासाठी येतात. इथं गर्दी असते. मंदिराजवळील फलक सांगतो, की हे ते ठिकाण आहे जिथे कृष्णाचा मृत्यू झाला होता. कृष्णाच्या निधनानं युगही बदललं. द्वापर युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. त्याच्या मृत्यूचा दिवस इ.स.पू. १७ फेब्रुवारी ३१०२ असा आहे.

हेही वाचा – भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

सोमनाथ मंदिरापासून भालका तीर्थ फक्त ४ किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा आणखी विकास करून मोठे पर्यटन केंद्र करण्याचा सरकारचा विचार आहे. हे ठिकाण रेल्वे आणि रस्त्याने खूप चांगले जोडलेले आहे. आठव्या मनुवैवस्वतातील मन्वंतराच्या २८ व्या द्वापरात भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या आठ व्या मुहूर्ताच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्याच्या जन्माचं वर्ष इ.स.पू. ३११२ असल्याचं सांगितले जाते. त्याच्या जन्मानुसार, महाभारताचे युद्ध इ.स.पू ३००० मध्ये झालं असावं.

कृष्णाचं वय किती?

असं मानलं जातं, की त्यांच्या मृत्यूच्या वेळी कृष्णाचं वय सुमारे ११९ वर्षे होते. मात्र, याबद्दल भिन्न धारणा आहेत. विष्णु पुराणानुसार कृष्णाचा मृत्यू १२५व्या वर्षी झाला. महाभारत घडलं तेव्हा तो ८९ वर्षांचा होता. महाभारत युद्ध झाले तेव्हा अर्जुन ५५, कृष्ण ८३ आणि भीष्म किमान १५० वर्षांचे होते असं मानलं जातं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment