

Man With 15 Wives And 107 Children : एका पुरुषाला १५ बायका आणि १०७ मुले आहेत..! वाचून धक्काच बसला असेल ना. हो पण हे खरं आहे. हा ६१ वर्षांचा माणूस एका छोट्या गावात सर्व बायकांसोबत राहतो. आपलं जीवन सुरळीत चालावं म्हणून त्यांनी सर्व पत्नींसाठी वेगवेगळी कर्तव्यं निश्चित केली आहेत. त्या माणसानं असा दावा केला की तो राजा शलमोनासारखा आहे, ज्याला ७०० बायका होत्या. डेव्हिड साकायो कलुहाना असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा पश्चिम केनियाचा आहे.
काय म्हणाला नवरा?
अफ्रिमॅक्स इंग्लिशशी केलेल्या संभाषणात, डेव्हिडनं दावा केला आहे, की त्याच्याकडं खूप चतुर बुद्धी आहे आणि त्याला मॅनेज करण्यासाठी एक महिला पुरेशी नाही. डेव्हिड म्हणाला, ”माझ्या विचाराप्रमाणे, एक स्त्री मला मॅनेज करण्यासाठी पुरेशी नाही. कारण माझ्या मनावर खूप भार आहे जो स्त्री सांभाळू शकत नाही. म्हणूनच मी एकापेक्षा जास्त लग्नं केली.”
हेही वाचा – VIDEO : रेशनच्या दुकानात मर्सिडीज गाडीवाला..! ४ गोणी टाकल्या डिक्कीत; इनक्रेडिबल इंडिया
“मी राजासारखा आहे”
व्हिडिओ मुलाखतीत डेव्हिड म्हणाला, ”मला 20 बायका असल्या तरी मला कोणतीही अडचण येणार नाही. मी राजा शलमोनासारखा आहे. शलमोनाला ७०० बायका आणि ३०० दासी होत्या. एकंदर हजार बायका.” सर्वात महत्त्वाचं म्हणजे, डेव्हिडच्या बायकाही त्याच्यावर खूप खूश आहेत.
हेही वाचा – डाय करूनही केस पांढरेच राहिल्यामुळं महिलेनं ब्युटी पार्लरवाल्याला झोडलं..! VIDEO व्हायरल
डेव्हिडला पत्नी जेसिका कलुहाना हिच्यापासून १३ मुलं आहेत. यापैकी २ बालकांचा मृत्यू झाला आहे. जेसिका म्हणाली, ”आम्ही शांततेत आणि एकत्र राहतो. माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे.” दुसरी पत्नी दुरिन कलुहाना म्हणाली, ”मला कोणाचाही हेवा वाटत नाही. आम्ही एकोप्याने राहतो.” डेव्हिडची पत्नी रोज कलुहाना म्हणाली, ”आम्ही चांगले आयुष्य जगत आहोत. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. रोज ही डेव्हिडची सातवी पत्नी आहे. रोझनं डेव्हिडच्या १५ मुलांना जन्म दिला आहे.