काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म, खनिजे, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असतात. त्यात जवळपास 90 टक्के पाणी असते.
टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तसेच तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत करतात.
टोमॅटोमध्ये 95 टक्के पाणी असतं. तुम्ही मोठ्या प्रमाणात टोमॅटो सेवन करू शकतात.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, लेट्युस आणि केल यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे असतात. हे त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरींचा समावेश होतो. ही फळं अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्यात भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे असतात.
शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी हे इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ते त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यात सायटोकिनिन असते. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.
ॲव्होवोकॅडोमध्ये निरोगी चरबी असते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन ई असते. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.
संत्री हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. पोटॅशियम असं पोषक तत्व आहे की, त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य उत्तम ठेवतं.